देऊनही मला ही देणार काय दारू ?
मस्तीत मीच माझ्या चढणार काय दारू ?
फेकून देत प्याला मी हा विचार केला
काळीज फाटलेले शिवणार काय दारू ?
बेतास बात सारे जगणे जगून झाले
जगण्यात झिंग नाही , करणार काय दारू ?
ज्यांनी निदर्शनांनी दारूच बंद केली
ते शेवटी म्हणाले घेणार काय दारू ?
ज्यांचा परिस्थितीने गांजून जीव जातो,
त्यांची कधी तरी का सुटणार काय दारू ?
-प्रसाद कुलकर्णी
संग्रह- गझलांकित
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा