यशोदीप








* यशदीप *



मी नभांवर नाचत आले
चांदण्यांवर चालत आले


वीज ही वर का चमकते
सूर्याला जर पाहत आले


बंड हे करणारच आता
विजयी मन हासत आले


सारले मळभट दु:खाचे
सुख हाती मावत आले


तेजस्वी मज साठीच वाटा
यशदीप लावत आले

- स्वप्ना








Taxonomy upgrade extras