आसपास

अलका काटदरे - ⏱ १ मिनिट

(येथे मी प्रथमच लिहित आहे.
मान्य्वरांकडून मार्गदर्शनाची अपेक्षा ठेऊन-सविनय).

सावली तुझी का झालासा मला भास
आभासावरच आहे जीव माझा तसा आसपास

शोधण्याचा तुला भरभरून झाला प्रयास
नसलेल्या अस्तित्वाचा म्हणा लागणार कसा तपास

कोण मला भिडूनी साधतो असा त्रास
येतो मनी फिरूनी एक इवलासा कयास

कळले नाही माझे सारे झाले केव्हा लंपास
जात जरी नाही मी कुणाच्या सहसा आसपास

आयुष्य सरले आसवांची न वाहता रास
का फिरूनी प्रयत्न तुझे उमटवाया ठसा आसपास?