इशार्यात एका कीती शब्द दडले
वाचायास डोळे, मला येत नाही
विझलेले निखारे उगी पेटवावे
तापत्या ज्वाळांचे खेळ, मला येत नाही
कितीदा सहावे मनांचे दुरावे
जिंकण्यास मनाला मला येत नाही
पुन्हा मांडलेले जुनेच खेळ सारे
तरी 'राज्य' माझे कधीच येत नाही
नवे दु:ख माझे जुन्या वेदनांचे
सुकले तरीही अश्रु पुसताच येत नाही
फुले पाहण्याचा उरला न आता छंद
पहीला सुगंध अजुनी विसरताच येत नाही.
उभा ठाकलेला आहे काळ दारी
तीच्या चेहर्याची ओढ जाउही देत नाही
सलिल चौधरी
(अलखनिरंजन यांच्या "मला वेळ नाही" या गझलेपासुन प्रेरीत)
गझल
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा