चळ

उपकार आसवांचे ... हसतो अजूनही मी
आभार जीवनाचे.... जगतो अजूनही मी

मद्यालयात जातो, मी सांजवेळ होता
गहिर्‍या नशेतही तुज, स्मरतो अजूनही मी

मज चेहराच हसरा, आहे असा मिळाला
त्या चेहर्‍यात माझ्या, दडतो अजूनही मी

माझी-तुझी कहाणी सरली अजून कोठे ?
त्या आसवात तुझिया, झरतो अजूनही मी

दिन चालले असे अन वय वाढते असे हे
तू भेटता परंतू... चळतो अजूनही मी