आकाश भरले आज ढगानी,वाराही सुटलेला
पावसासोबती कोसळतील,विजाही परसात तुझ्या
दिवेलागणीवेळी स्वत:ला, मी आज पेटवून घेतले
जळताना डोळे भरुन पाहीले,अन्ध या दुनीयेस तुझ्या
चावडीतल्या पारावरती,मी पाठ माझी टेकली
ती पुराणी धर्मशाळाही,उरली नाही गावात तुझ्या
मी धावता म्रुगजळामागे,त्यानीच मला सन्था दिली
एकही तो भ्रमर भुलणार नाही,कागदी ताटव्यास तुझ्या
चिता पेटवण्याआधी श्वास पाहण्याची,तसदी घेतली नाही कुणी
याही जन्मी जिवन्त जळलो,डोळ्यादेखत मी तुझ्या
आज सम्पेल जीवन येथे,ना सम्पेल पण ही कहानी
परीघावरचा मी प्रवासी,येईन फिरूनी दारी तुझ्या!
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा