हा माझा पंथ नाही




कोण जाणे मी कुणाला का कधी पसंत नाही?
नापसंतीची त्यांच्या मजला कधी खंत नाही ||१||


बोलतो मी अर्वाच्य नुसते सारेच हे म्हणती असे
अभंग बोलण्यास मग मीही टाळकुट्या संत नाही  ||२||


बोलणे माझेच का काट्यापरी  खुपे त्यांना?
फुलापरी बोलायाला बहराचा मी वसंत नाही ||३||


थांबता का मजसाठी? कितीदा पुसावे त्यांना
थांबण्यासाठी इथे पण कुणालाच उसंत नाही ||४||


चालणे मलाच आता कठीण वाटू लागले
आपोआप चालण्या मी ज्ञानियाची भिंत नाही ||५||


जिंकीवी ह्रदये सारी गोड लटके बोलुनी
गोडीत गळा कापण्याचा हा माझा पंथ नाही ||६||


कवी:- श्रीराम समर्थ
निमित्त:- महेश अवसरे




Taxonomy upgrade extras