गरज माझी असता लागले टाळायला मला
त्यांची वेळ आली तर आले कवटाळायला मला ।
मी सोशिले चटके दु:खभरल्या क्षणांचे
मग आला वैशाखवणवा जाळायला मला ।
हात कुणाचे मिळावे म्हणून पाय कुणाचे ओढले
रीत जगाची लागली पाळायला मला ।
काल या इथेच ज्यांनी दगड होते मारले
आज आले गजरे माळायला मला ।
कामना केली ज्याची ते सारे मिळाले
माझ्या नशिबावर झाले भाळायला मला ।
चटक लागली मला सत्तेची आणि संपत्तीची
घाम नव्हे रक्त लागले गाळायला मला ।
पश्चात्तापाच्या अश्रुंनी मी पुरता भिजलो
जन्म एक अपुरा पडेल वाळायळा मला ।
जीवनाच्या शर्यतीत मी एकटाच उरलो
मॄत्यु आला धावुन कुरवाळायळा मला ।
नाव माझे आले वॄत्तपत्राच्या कोपर्यात
खबर म्हणून लगले चाळायला मला ।
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा