रात्र बोलते माझ्याशी दिवस रुसून आहे
चंद्र हासतो पुनवेचा सूर्य डसून आहे
मरण खेळते प्राणाशी रोज नवीन खेळी
मी हताश जन्मापाशी फक्त बसून आहे
झोप लागते विश्वाला पेंग जगाला येते
मीच तरी तुझियासाठी श्वास कसून आहे
पिंजऱ्यातुनी तो तेव्हा दूर उडाला पक्षी
सापळ्यात आयुष्याच्या मीच फसून आहे
अमृतास प्रारंभी मी ओठ लावले होते
तेच वीष ओटीपोटी लूसलुसून आहे
ज्या तुझ्याच होत्या ओळी, अर्थ जे तुझेच होते
तेच गीत ओठी माझ्या आज ठसून आहे
दीपक करंदीकर
१०४४/४/२, 'दर्शन ', गायआळी
रहाळकर राम मंदिरासमोर
सदाशिव पेठ, पुणे-४११ ०३०.
भ्रमणध्वनी- ९४२३००७०३५
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा