माझ्याकडे जगाचे हसणे उधार आहे....
त्या कोवळ्या कळीचे फुलणे उधार आहे....
घायाळ वेदनांनी केले उरात घरटे..
आगीत त्यास तेथे नेणे उधार आहे....
कोणास ठाव कोठे जाईल जीव माझा..
थोडे अजून बाकी जगणे उधार आहे....
देहावरी फुलांचे फेकाल हार माझ्या
उपकार परत ते ही करणे उधार आहे....
हा जन्म घेतला मी तोट्यात काल येथे
त्याचेच व्याज मजला देणे उधार आहे....
[अलामत न पाळल्यामुळे गझल विचाराधीन करण्यात येत आहे--विश्वस्त]
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा