जो मार्ग निवडला होता, वाटले फुलांचा रस्ता
पण आज अचानक कळले, काट्यांनी भरला होता...
हास्यात हुंदक्यांना मी आवरून गेलो
पण एक अनावर हुंदका केव्हाच निसटला होता...
मी शोधत होतो माझे चांदणे गौर पुनवेचे
अन सभोवती अवसेचा काळोख दाटला होता...
मी समजत होतो आता डाव हा जिंकलो आहे
पण शेवटचा फासा तर नियतीच्या हाती होता...
परि जीवन सुंदर होते, जगणेही सोपे होते
जोवरी तुझ्या असण्याचा आभास बोलका होता...
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा