दोन श्वासात बीजाला कधी कोम्ब येत नाही
पापणीत अश्रु दाटे त्याचे दव होत नाही
ओठ गाली चुम्बीतात फिरे बटेतून हात
घेतले नुसते मिठीत त्याने प्रेम होत नाही
सूर्य अस्तास पावतो चन्द्र रात जागवितो
चन्द्र नसता चान्दणे तेथे भय येत नाही
गात आहे कोकिला ती प्रेमे वसन्त ऋतूत
रंग काळा प्रकटला त्याचे कुहू होत नाही
प्रेमभंग झाला तया वाटे जीवन संपले
प्रेम ज्याचे जीवनावर त्याचे वय होत नाही
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा