कैदखाना

राहिला नाही फुलांना वास थोडा;
अन् कमी झाला फुलांचा त्रास  थोडा.  

एवढ्याने माणसे झाली सुगंधी;
अत्तराचा छान होता वास  थोडा.

सोडला जेव्हा तुझा मी नाद तेव्हा;
फक्त काही दिवस झाला त्रास  थोडा.

ज्या फुलांच्या काल मी बागेत गेलो;
त्या फुलांचा रोज होतो भास  थोडा.

भाकरीचा जीव तेव्हा शांत झाला;
घातला पोटात जेव्हा घास  थोडा.

सज्जनांनी जर मला बदनाम केले;
तर कमी होईल त्याचा त्रास  थोडा.

एवढा मी गुंतलो नाही तुझ्याशी;
की, तुझा लागेल आता ध्यास  थोडा.

जीव हा गेला किती बघ शांततेने;
बोलला मज गोड जेव्हा फास  थोडा.

हा गजांचा वा फुलांचा कैदखाना;
बंधनांनी गुदमरे हा श्वास  थोडा.

                    -- अभिषेक घ. उदावंत
                      
  संवेदना रायटर्स कंम्बाईन,
                        अकोला.

Taxonomy upgrade extras