जखमेवरुन खपली काढू नकोस माझ्या;
आधीच रक्त नाही देहात फार माझ्या.
घायाळ पाखराने घ्यावी नवी भरारी;
नभ हे मुठीत यावे तैसे करात माझ्या.
देहात आग जळते आगीत देह जळतो;
जळण्याशिवाय सखये नशिबात काय माझ्या.
नेऊ नको मला त्या स्वप्नात तारकांच्या;
डोळ्यात चंद्र तारे रडतात खूप माझ्या.
स्वातंत्र्य जीवनाला होईल प्राप्त केव्हा;
माझाच कैदखाना कैदेत मीच माझ्या.
- मनोज सोनोने
संवेदना रायटर्स कंम्बाईन,
अकोला.
[अकारान्त अन्त्ययमके असल्याने विचाराधीन करण्यात येत आहे--विश्वस्त]
Taxonomy upgrade extras