मी कधी म्हणणे "मला हे शक्य नाही"
शक्य नाही शक्य नाही शक्य नाही
मोह ना पडणे मला या जीवनाचा
हे तुझ्या भोळ्या अदांना शक्य नाही
ईश्वरा डरतोस कसला, आहे मी
जर तुला अवतार घेणे शक्य नाही
शरम सोडुन बोलणे का शक्य नाही?
ती म्हणे "ना जाणते पण शक्य नाही"
कृत्य आठवली की मी ही मानतो
'काल' जैसा 'आज' होणे शक्य नाही
माझिया नशिबातही ये ना जरा तू
संधिसाधू नशिब म्हणते "शक्य नाही"
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा