गझल

गझल

उलटे

उलटे तरून गेले
सुलटे हरून गेले

जपले गाव मी...पण
घरचे घरून गेले

मरणात गुंतलो अन
जगणे सरून गेले

श्रद्धांजली सग्यांची
शव गुदमरून गेले

जगणे उपेक्षितांचे
डोळे भरून गेले

कळले कसे जगावे
मरणे मरून गेले

थाळीत आंधळ्यांच्या
थोटे चरून गेले

हसणे तुझे मला ते...
जखमी करून गेले

अवघे पुरात चेले
नेते वरून गेले

पुतळा उभारला....पण
नाव विसरून गेले

ते दोन शब्द त्यांचे
दंगल करून गेले

रस्ता

हा ओळ्खीचा रस्ता
नेई कुठे ?... हा रस्ता
सांभाळ...तेथे खड्डा
घेई कुशी, हा रस्त्ता
वळणात वळतो सहजी
साधा.. सरळ.. हा रस्ता
ना एकदाही गेला
गावी तुझ्या हा रस्ता
चौकात एक दुज्याला
गाठून भेटे हा रस्ता
ठावूक हे कोणाला
झोपे कधी हा रस्ता ?
'धरतो नभा' म्हणूनी
उंचावला हा रस्ता
सोसून

आम्ही


हे रोजचेच गाणे
आम्ही तरी दिवाणे


प्रश्न ढकलू दुज्यावर
आम्ही दळू उखाणे


रे आव जिंकण्याचा
आम्ही जरी उताणे


यश बैसले समोरी
आम्ही लिहू बहाणे


वेडीच वाट त्यांची
 आम्हीच ते शहाणे


आरंभ भैरवीने
आम्ही  असे घराणे


आम्हांस कुरमुरेही
काजू बदाम खाणे


वाळीत गाव घाली
आम्ही मनुष्यघाणे

नाही

भेटलो शब्दात नाही आणि प्रत्यक्षात नाही जमविले कित्येक मोती ओवले धाग्यात नाही पेरतो वाटेत काटे फूल मम भाग्यात नाही साजरे केलेत सण मी 'घर' जरी वाड्यात नाही देव हा ही पावतो ना, रांग का दारात नाही ? फास घे तू धोतराने लाज या नेत्यात नाही आसवे डोळ्यांत त्यांच्या ओल ती

घाव

नजर पडली मजवरी कोरी शिवीही द्या कुणी
हृदय जखमांनीच सजते घाव अजुनी द्या कुणी

फाटक्यां वस्त्रांस नसते फाटण्याची काळजी
लक्तरे सांभाळण्यापरि पेटवूनी द्या कुणी

साथ जीवनभर नको जी स्वार्थ जागविण्या असे
पिंड नाही देह माझा त्या मुखासी द्या कुणी

यज्ञ आरंभून सगळे व्हा सुखी जगतात या
अग्निला अपुल्या सुनेची आहुतीही

पहारे

होते किती पहारे
पण पोचले इशारे

ना आज भेट झाली
हे कालचे शहारे!

तो दंश प्रिय होता
मी टाळले उतारे

ते स्पर्श्,चांदण्याच्या
वर्खातले निखारे!

काया मयूर झाली
प्राणा  नवे पिसारे

दोघातले गुन्हे,अन्
दोषी ऋतू बिचारे

 

(जयन्ता५२)


 


 


 

 


 





 

भळभळतांना जाणवले की..

(माफ करा, आता अगदी राहवतच नाहीये, म्हणून गेल्या १३ दिवसांचा गझललेखनाचा उपवास सोडतो आहे.)

=============================

भळभळतांना  जाणवले  की  रुतले  होते  टोक  किती
जगण्याच्या  माथ्यावर  पडली  'तू  नसल्याची ' खोक  किती..!

सुखा, तुझ्यापाठी  पळतांना  जाणवले  नाहीच  कधी,
अस्तित्वाच्या  ताठ  कण्याला  सुटले  माझ्या  पोक  किती !

परस्परांशी  सौहार्दाचे  प्रयोग  रंगत गेले  अन्
पडद्यामागे जाता  जाता  बदलत गेले 

अहं ब्रह्मास्मि

पाहिले अंती जगाच्या काय मी ही साधले..
सूक्ष्म झालो मीच आणिक मी जगाला व्यापले

कृष्ण होतो गोकुळी अन् राम होतो दशरथी
कंस - रावण मीच होवुन मीच मजला मारले

बोधिसत्वाच्या रुपाने धम्मतत्वा मांडण्या..
त्यागुनी प्रासाद-गोष्टी मीच मजला त्यागले

प्रलयकारी होवुनी उद्दाम होतो मी जरी...
नाव तारूनी मनूची मीच मजला तारले

रोजचेच

गिरवतोय रोजचेच
नाद तेच, वाद तेच

लोचनी तिच्या सदैव
पाहतो नवेच पेच

वागतो किती जपून
लागते मधेच ठेच

नेमकी फुले गहाळ
पाकळ्या हळूच वेच

भार फार नियमनात
बोलतात आकडेच

काय लढवशी गडास
जर फितूर आतलेच

चेहरे तसे नवीन
चर्म, कर्म, धर्म तेच

डाव खेळती जुनाच
यास पाड, त्यास खेच

चार यार जोडलेत
भार वाहतील तेच

चल चहाच सांग दोन
परवडे खिशास हेच


पापणी


बोलताना तू अशी झुकविते का पापणी ?
भाव डोळ्यातील ते, लपविते का पापणी ?

चांदण्यांची सावली, भेट तेथे आपली
आठवण माझीच ती, झुलविते का पापणी ?

कोणता हा सल सखे, जाळतो तव अंतरा
शब्द ही ओठी नसे, हरविते का पापणी ?

आजही पाऊस तो, थांबता दारी तुझ्या
लावताना दार तू