गझलविषयक लेख

भटसाहेबांच्या सहवासात...

कविवर्य सुरेश भट ह्यांचा आज (१५ एप्रिल १९३२) ८५ वा जन्मदिन. त्यानिमित्त... 

आपण एका अद्भुत काळात जगत आहोत, एका ऐतिहासिक कालखंडाचे साक्षीदार आहोत, ही जाणीव तो काळ जगत असतानाच माणसाला परिपूर्णतेनं होती तर ?...तर त्या वेळच्या अनुभवांद्वारे स्वतःला आणखी समृद्ध करून घेता आलं असतं...त्या वेळी महत्त्वाचे न वाटलेले; पण पुढं

आपले रडणे....एक रसग्रहण

आसवे म्हणजे कवन आहे जणू
आपले रडणे सृजन आहे जणू
-कविता शब्दांची असते. पहिल्या ओळीत आसवांना कवन म्हणून गझलकार दोन पातळ्यांवर अर्थसूचन करतो. एक म्हणजे आसवे स्वतः एक कविता आहेत. (साध्य). दुसरी पातळी म्हणजे, आसवांमुळेच एक कविता तयार होत आहे. (साधन).दुस-या ओळीमधून गझलकार असे सांगतो की, या आसवांच्या कवितेमुळे जे

शेरो-शायरी : प्रस्तावना

नमस्कार काव्य-प्रेमी मित्रांनो,
आज दि.१५ अप्रिल रोजी कै. सुरेश भट ह्यांच्या जन्म-दिनाचे औचित्य साधून शे(अ)रो-शायरी ही नवीन लेखमाला सुरु करताना मी आनंदलो आहे.

ह्या उपक्रमाविषयी आणि त्याच्या नावाविषयी थोडेसे सांगतो-
गेले काही महिने , नावाजलेल्या उर्दू शायरांच्या काही निवडक गझलांचा अर्थ काव्य-प्रेमींपर्यंत पोहोचविण्यासाठी काहीतरी करावे असे मनात होते. ह्याचे कारण

अनंतची गझल

उर्दूतली तरलता, हिंदीच्या दुष्यंतकुमाराची सरलता आणि आपल्या गझलेला असलेला आपला स्वतःचा चेहरा हे अनंतच्या गझलेची वैशिष्ट्ये आहेत... ... ती संयतही आहे आणि हळूच भाष्य करणारीही. समाज, प्रेम, दुःख, उत्सव साऱ्यांनी ती युक्त आहे. मराठी गझलविश्वात आपले वेगळेपण सिद्ध करणाऱ्या गझलकारांपैकी डॉ. अनंत ढवळे हा एक तरुण गझलकार आहे. समृद्ध उर्दू

ज्योत छोटीशी जरी.. रसग्रहण

मित्रहो, वैभव देशमुख यांच्या ज्योत छोटीशी जरी...या आणखी एका गझलेचे रसग्रहण सादर करीत आहे.

ज्योत छोटीशी जरी आहोत आपण
घाव काळोखावरी आहोत आपण
- लहानशा ज्योतीनेही अंधार कणभर का होईना, दूर होऊ शकतो ही पारंपरीक कल्पनाच कवीने मांडलेली आहे पण नावीन्यपूर्ण ढंगात मांडलेली आहे. पेटलेली प्रत्येक ज्योत ही केवळ ज्योत

पहा ग़ालिब काय म्हणतो

"पहा ग़ालिब काय म्हणतो," असे म्हणत समीक्षकसाहेबांनी हा शेर ऐकवला -- 
बक़द्रे शौक़़ नहीं ज़र्फ़े-तंगनाए-ग़ज़ल 
कुछ और चाहिए वुस‌्‌अत मेरे बयाँ के लिए 
(गझलेचे मैदान लहान पडते आहे. मला थोडी मोठी जागा हवी.)

समीक्षकसाहेबांच्या मते आकृतिबंधाच्या नियमांमुळे एक्स्प्रेशनवर मर्यादा पडतात ह्याची जाणीव गालिबने ह्या शेरामध्ये व्यक्त केली आहे. परिसंवाद

शे(अ)रो-शायरी , भाग १०: वह शख़्स कि मैं जिससे मुहब्बत नही करता

मित्रांनो,
’प्रत्येक शेरात एक चांगला विचार, अतिशय साध्या, पण चटकन अपील होणाऱ्या शैलीत मांडल्या गेलेली, कतील शिफाई ह्यांची एक साधी-सोपी गझल अगदी अलिकडेच माझ्या वाचण्यात आली, आणि तीच मी शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या १० व्या भागात आपल्याशी ’शेअर’ करतोय.
मतला असा आहे की-

वह शख़्स कि मैं जिससे मुहब्बत नही करता

शे(अ)रो-शायरी, भाग-९ : टूटी है मेरी नींद मगर तुमको इससे क्या

===मित्रांनो,
परवीन शाकिर म्हणजे पुरुष-प्रधान संस्कृतीच्या विरोधात आपला आवाज नेहमीच बुलंद करणारी एक बंडखोर,आणि प्रखर स्त्री-मुक्तिवादी पाकिस्तानी कवियत्री! सगळी बंधने, मर्यादा, नीती-नियम फक्त स्त्रियांसाठीच का?- हा प्रश्न परवीन भोवतालच्या पुरुष-प्रधान समाजाला नेहमीच ठणकावून विचारायची. स्त्रियांवरील अन्यायाची परिसीमा गाठणाऱ्या पुरूष-प्रधान रुढी, आणि तितक्याच सडक्या व गळक्या परंपरा ह्यांचा परवीनने नेहमीच कडाडून

शे(अ)रो शायरी, भाग-८ : कभी नेकी भी उसके जी में गर आ जाये है मुझ से

मित्रांनो,
शे(अ)रो-शायरीच्या ह्या आठव्या भागात आपण मिर्झा गालिब ह्यांच्या एका खूबसूरत गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही गझल लतादीदी आणि आशाताई ह्या दोघींनीही गायली आहे, आणि फार पूर्वी विविध-भारतीच्या रंग-तरंग ह्या कार्यक्रमात लागायची.
मतला बघा, असा आहे-

कभी नेकी भी उसके जी में गर आ जाये है मुझ से
जफ़ायें करके

शे(अ)रो शायरी, भाग-७ : वो लब कि जैसे सागर-ए-सहबा दिखाई दे

प्रिय मित्रांनो,
शे(अ)रो शायरीच्या ह्या ७व्या भागात आपण कृष्णबिहारी नूर ह्यांच्या एका, अतिशय रोमॅंटीक मतला असलेल्या, गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही गझल मी पहिल्यांदा नेटवर, दुबईला झालेल्या एका मुशायऱ्याच्या ऑडियो क्लिपमधे ऐकली, तेथे तिला श्रोत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.. गझलही तशीच आहे..लाजवाब!
मतला बघा कसा रसरशीत आहे तो,.....एका बहारदार कल्पना-विलासाचा