गझलविषयक लेख

शे(अ)रो शायरी, भाग-६ : तफरीह का सामान किया जाये

नमस्कार मित्रांनो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या ६व्या भागात आपण सुप्रसिद्ध शायर कतील शिफाई ह्यांच्या एका आशयसंपन्न गझलेचा आस्वाद घेणार आहोत.
ह्या गझलेची चित्र-ध्वनीफित मी आंतरजालावर बघितली आणि त्यातील सर्वच्या सर्व शेर मला अतिशय आवडले. हीच गझल मी तुमच्याशी ह्या भागात शेअर करतोय... बघा किती सुरेख लिहिले आहे ते! मतला असा आहे

शे(अ)रो शायरी, भाग-५ : दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है

नमस्कार काव्य-प्रेमी मित्रांनो,
"हमारी दोस्ती से दुश्मनी शरमाई रहती है’ असा मतल्यातला पहिलाच मिसरा असलेली गझल, आणि ती आपल्याशी ह्या लेखमालेच्या ५व्या भागात’शेअर’ करताना, आजचा ’मैत्री दिवस’ हा ’मुहूर्त’, हा खरे तर परमेश्वरानेच जुळवून आणलेला एक छान योगायोग म्हणावा लागेल. आधी त्याचेच आभार मानतो. असो.
मित्रांनो,
अस्सल भारतीय मातीचा गंध

शे(अ)रो-शायरी, भाग-४ : खिलौने नहीं चलते

नमस्कार मित्रहो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या ४थ्या भागात आपले स्वागत करतो. मित्रांनो, जिथे रोमॅंटीसिझम, रम्य कल्पना-विलास हे उर्दू शायरीचे एक मुख्य वैशिष्ठ्य मानल्या गेले आहे, तिथे, सर्वच शेर वास्तव-दर्शी असलेली, शकील जमाली ह्यांची, एक अतिशय दर्जेदार गझल, अलिकडेच माझ्या वाचण्यात आली, आणि तीच गझल, तिच्या ह्या वैशिष्ठ्यामुळेच, मी आपणासोबत शेअर करतोय

सहज मनापर्यंत पोहोचलेले....

एखादा शेर किंवा गझल आवडण्यासाठी वाचणाऱ्याचं गतायुष्य, अनुभवविश्व, पूर्वग्रह, आकलनक्षमता, शब्दभांडार अशा अनेक चाळण्या पार कराव्या लागतात. अशा वेळी एखादा शेर पटकन मनाला भावतो. कारण माझ्या मते त्यात आपल्याच कल्पनाविश्वाचा अंश असतो. मला या संकेतस्थळावरचे असे बरेच शेर / गझला आवडल्या आहेत. त्यापैकी काही वाचल्यानंतर मला जे वाटले ते मी

माझ्या काळाचा अनुवाद

खरे तर दार वा-याने...

गझलकार अनिल कांबळे यांच्या एका गझलेचा मतला मला खूप आवडतो.
खरे तर, दार वा-याने जरासे वाजले होते
कितीदा तूच आल्याचे मनाला वाटले होते...

...खरं तर वा-यानेच दार वाजलं होतं, वाजत होतं पण तूच आलीस असं प्रत्येकवेळेला वाटत होतं. हं...तू येणार नाहीस हे मला पक्कं ठाउक आहे पण माझं वेडं मन

शे(अ)रो-शायरी, भाग-३ : तुम्हारे खत में

नमस्कार मित्रांनो,
शे(अ)रो-शायरीच्या ह्या लेखमालेच्या, तिसऱ्या भागात आपले स्वागत करतो. आज आपण प्रसिद्ध शायर दाग देहलवी ह्यांच्या ’तुम्हारे ख़त में नया इक सलाम किस का था’ ह्या प्रसिद्ध गझलेचा आस्वाद घेणार आहोत. ही गझल मला आपल्याशी ’शेअर’ कराविशी वाटली, कारण ह्यातील अंदाज-ए-बयाँ म्हणजे सांगण्याची पद्धत, मला अतिशय आवडली. जे म्हणायचे

शे(अ)रो-शायरी, भाग-२: पा-ब-गिल सब है

नमस्कार मित्रांनो,
शे(अ)रो-शायरी ह्या लेखमालेच्या दुसऱ्या भागात आपण पाकिस्तानातील एक प्रसिद्ध कवियत्री परवीन शाकिर हिच्या एका गझलेतील काही निवडक शेरांचा आस्वाद घेणार आहोत. ह्या कवियत्रीची गझल घेण्याची दोन मुख्य कारणे म्हणजे-
१) ह्या गझलेत पाकिस्तानातील वैचारिक दडपशाहीचे, अभिव्यक्ती-स्वातंत्र्याच्या गळचेपीचे अतिशय बोलके प्रतिबिंब पडले आहे, आणि ही गोष्ट ही गझल वाचता

शेरो-शायरी: दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ

मिर्झा गालिब ह्यांच्या रचना अर्थाच्या दृष्टीने इंद्र-धनुष्यासारख्या असल्या तरीही अर्थ पेलायचा असल्यास त्या शिव-धनुष्या सारख्या आहेत, असे मज नेहमी वाटते. या तर, हे शिव-धनुष्य आपल्याला उचलायला जमते का ते बघू!

चला तर,मिर्झा गालिब ह्यांच्या ’दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुआ’, ह्या प्रसिद्ध गझलेने आपण सुरुवात करुया. त्यातील काही निवडक शेरांचा अर्थ आपण

गालिब बेनकाब

पुछते है वे कि गालिब कौन है
कोइ बतलाये कि हम बतलाये क्या

सिमला येथे ४ मार्चला बाजारात शायरीची पाच, सात पुस्तके मिळू शकली. त्यात एक आहे हंसराज रहबर यांचे 'गालिब बेनकाब'!

पुस्तक अगदीच पटणार नाही असे नाही. अर्थात, ते पटले काय अन नाही पटले काय, गालिबना जगाने डोक्यावर घेतलेले