कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते. 

भटांवरचे लेखन

भटांवरचे लेखन

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही

"भटांच्या निवडक उत्तमोत्तम गझलांपैकी 'आम्ही' ही एक आहे. तिच्यातील आशय
मनावर आदळताना ठिणग्या उडतात. गझल असल्यामुळे तिची बांधणी कमालीची रेखीव;
पण बांधणी वाटू नये एवढा सहज-स्वाभाविक आविष्कार. विरोधन्यासाचा
परिणामकारक वापर. या सर्व विशेषांमुळे रसिकांच्या मनाचा ती सहज कब्जा घेते."

मराठीतील ज्येष्ठ कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम पाटील ह्यांनी सुरेश भटांच्या गाजलेल्या 

रंग माझा वेगळा - लता मंगेशकर ह्यांचे पत्र

"बुद्धिविलास दाखवणारे काव्य हे रसिकाला चकित करते. स्तीमित करते, थक्क
करते पण जे गाणे किंवा जे काव्य कलावंताच्या हृदयातून उत्स्फूर्तपणे प्रकट
होते, ते ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेते. त्यात भपका नसेल, डामडोल नसेल,
ऐट नसेल, पण त्यातली उत्कटता, सरलता आणि प्रांजळपणा हा सरळ आपल्या हृदयात
प्रवेश करतो."

'रंग माझा वेगळा' हा

रंग माझा वेगळा प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे

"सुरेश भटांना गझलेचे फार मोठे आकर्षण आहे. कारण 'गझल' हे केवळ वृत्त नसून
ती एक वृती आहे. एव्हढेच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृतीही
आहे."

"रंग माझा वेगळा" ह्या भटांच्या गाजलेल्या कवितासंग्रहाला पुलंचे प्रास्ताविक लाभले होते. हे प्रास्ताविक दोन भागात सादर आहे.

मराठी गझलांचे चैतन्य

दुआ करो, मेरी खुश्बू पे तबसिरा न करो 
कि एक रात में खिलना भी था, बिखरना भी - 
कैसर-उल-जाफ़री 

"माझ्यासाठी शुभकामना करा, माझ्या सुगंधाची समीक्षा करत बसू नका; मला तर एकच रात्र लाभली होती, आणि मला फुलायचंही होतं आणि वाऱ्यावर विखरूनही जायचं होतं." कविश्रेष्ठ सुरेश भटांनी मराठी भाषेत गझल

हरफनमौला सुरेश

गाण्याचा गळा व गाण्यात रुची या गोष्टी सुरेशमध्ये आहेत; हे आमच्या आईच्या (ती. कै. शांताबाई भट) ध्यानात आले. म्हणून सुरेशच्या गाण्यातील रुची वाढावी, काही माहिती व्हावी यासाठी तिने एक बाजाची पेटी (विश्वास कंपनी, कोलकाता) आणली आणि त्याला संगीताची मुळाक्षरे व बाराखडी शिकविणे सुरू केले. आमची आई ही स्वत: चांगली पेटी

सुरेश भटांच्या त्या दोन ओळी...

sureshbhat.in या संकेतस्थळावर मला जवळपास दोन वर्षें होतील. सुरेश भट आणि त्यांच्यासंबंधी बर्‍याच गोष्टी वाचायला - अभ्यासायला मिळाल्या. केवळ रदिफ-काफिया घेऊन गझल करता येत नाही. त्यातील बाह्यतंत्र आणि आंतरिक तंत्र या दोनही गोष्टींवर चर्चा ऐकायला/वाचायला आणि अर्थातच करायला मिळाल्या. सुरेश भटांचे काव्य हे गझलकारांना एक प्रेरणास्त्रोत असते हे अनुभवायला मिळाले

सुरेश भटांच्या गझलांमधील तरल भावकाव्य

'कविता ही बहुरुपिणी आहे' हे वाक्य 'कुसुमाकर' सारख्या कवितांना प्राधान्य देणा-या मासिकाच्या वाचकांना, सांगण्याची गरज नाही; तरी सुद्धा लिहिले आहे. कविता, गीत, लावणी, पोवाडा, अभंग, ओवी (अगदी आरती सुद्धा) कवितेचीच रूपे आहेत. त्यातलेच एक रूप, एक आकृतिबंध (फॉर्म) म्हणजे गझल.

महाराष्ट्रात तरी गझलचा 'वाचक' कमी आणि श्रोता जास्त असावा, असा

तुकारामांनंतरचा शब्दपूजक कवी : सुरेश भट

एखाद्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या व्यक्ती-विभूतीबद्दल चमत्कारिक वदंता निर्माण करण्याची एक अत्यंत वाईट अशी सामूहिक खोड आपल्या समाजाला लागली आहे.
विशेषतः कवितेच्या क्षेत्रात तर ती फारच विकृत झाली आहे. कवी काय तर म्हणे 'गॉड गिफ्टेड' म्हणजे जन्मतःच तो कवी असतो वगैरे. कवित्व हे जिवंत हृदयाचे व शब्दांच्या अर्थच्छटांच्या जाणकारीतून उमटणारे

विजा घेऊन- १

कविवर्य सुरेश भटांनी आपल्या काव्यलेखनाच्या प्रथमार्धात ज्या एकापेक्षा एक सरस गझला दिल्या, त्यापैकी 'आम्ही' ही एक अविस्मरणीय गझल आहे. 'कविता : विसाव्या शतकाची' या ग्रंथाच्या संपादकांनी त्यांच्या काव्याविषयी जे मूल्यमापन केले आहे, त्याच्याशी कुणाचे दुमत होईल, असे नाही. 'सुरेश भटांनी मराठी गझलेचे पुनरुज्जीवन केले नाही, तर तिला नवी कांती दिली