
केला खरेपणाचा नाही विचार त्यांनी
कित्येक गोड गाणी केली तयार त्यांनी
माझा मुळीच नव्हता तो प्रश्नही चुकीचा
ही उत्तरेच सारी केली हुशार त्यांनी
हातात घोषणांचे घेऊन खास फासे
हा मांडलाच आहे सारा जुगार त्यांनी
का तत्त्वनिष्ठतेच्या ते सांगतात गोष्टी
हे कोणते खिसे जे केले उदार त्यांनी !
या धूर्त धोरणांची आता कमाल झाली
राखेतुनी उद्याच्या नेली शिकार त्यांनी
उरल्या हातात तुमच्या या कोरड्याच फांद्या
त्यांच्यासेवच नेली त्यांची बहार त्यांनी
-- नीता भिसे
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा