
हासले बऱ्यापैकी, डोलले बऱ्यापैकी
त्याच त्या तालावरी मी नाचले बऱ्यापैकी
आखुनी होती दिली मज पूर्वजांनी धोरणे
ठेवुनी लक्षात ती मी वागले बऱ्यापैकी
बदलणाऱ्या वास्तवाची जाण होती ठेवली
मग नव्या साच्यामध्ये मज कातले बऱ्यापैकी
घडत होत्या सारख्या स्वत्त्व डिवचणाऱ्या चुकी
चुकत चुकतच सत्त्व माझे राखले बऱ्यापैकी
मोजले माझेच मी बेरंग या फसव्या जिण्याचे
पण स्वतःचा रंग घेउन रंगले बऱ्यापैकी
-- नीता भिसे
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा