विचाराधीन

तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.

हा माझा पंथ नाही

कोण जाणे मी कुणाला का कधी पसंत नाही?
नापसंतीची त्यांच्या मजला कधी खंत नाही ||१||

बोलतो मी अर्वाच्य नुसते सारेच हे म्हणती असे
अभंग बोलण्यास मग मीही टाळकुट्या संत नाही  ||२||

बोलणे माझेच का काट्यापरी  खुपे त्यांना?
फुलापरी बोलायाला बहराचा मी वसंत नाही ||३||

थांबता का मजसाठी? कितीदा पुसावे त्यांना

सारं दु:ख सोसलं

सुखावल्यासारखं हसत हसत सारं दु:ख सोसलं
दु:खावणार्‍या बांडगुळांना मित्रांसारखं पोसलं ||१||

आपलं म्हणुन मायेने ज्यांना जवळ केलं
माया विसरुन सारी त्यांनी सापासारखं डसलं ||२||

निसरड्या अरुंद वाटांवरुन तोल सावरत गेलो
राजरस्त्यावर नशीब मात्र बावळ्यासारखं फसलं ||३||

वखवखत्या भुकेला त्यांच्या पोटभरुन दिलं
अतृप्त त्यांच्या भुकेने अधाशासारखं तोंड वासलं ||४||

दु:खात घडोघडी

तुझ्या

आकाश भरले आज ढगानी,वाराही सुटलेला
पावसासोबती कोसळतील,विजाही परसात तुझ्या

दिवेलागणीवेळी  स्वत:ला, मी आज पेटवून घेतले
जळताना डोळे भरुन पाहीले,अन्ध या दुनीयेस तुझ्या

चावडीतल्या पारावरती,मी पाठ माझी टेकली
ती पुराणी  धर्मशाळाही,उरली नाही गावात तुझ्या

मी  धावता म्रुगजळामागे,त्यानीच मला सन्था दिली
एकही तो भ्रमर भुलणार नाही,कागदी ताटव्यास तुझ्या

चिता पेटवण्याआधी श्वास पाहण्याची,तसदी

जीवन

आठवण आज पुन्हा येते
मन तुझ्या अंगणात घेऊन जाते
काही केल्या तुझा चेहरा डोळ्यासमोरून सरत नाही
तुझी हासरी छवी बघून मन भरत नाही

यालाच का प्रेम म्हणतात
जवळ असताना हे कळत नाही
दूरगेल्यावर बरचं काही कळत
जवळ असताना मग वळत का नाही

प्रेम असच असत कसं
कस्तुरी हरणाला जवळ असताना

vachane

तुझा पहिला स्पर्श
सांगून गेला बरचं काही
पहिलं चुंबन आठवतो
आणी  कळत तुझ्याशिवाय
माझ्या जिवनाला अर्थ नाही.

अर्थासाठी दूरदेशी आलो
पण आज  मला कळते मी
माझ्यापासून हिरावलो
प्रत्येकतक्षणी तुझी आठवण
तुझे नशिले डोळे
मनाशीच हसतो
आणी मग हसतात मला
ईथले गोरेकाळ

क्षण एक वाटते
या अर्थाला काही अर्थ नाही
पण...........आठवतात

sukhacha mantra

।।सुखाचा मंत्र।।

कस वागवं तुझ्याशी तेच मला कळत नाही
तुझाच आहे मी हेच तुला कळत नाही।

आताशा मी रागवायच सोडल ,तुला वाटतं मी तुझ्यापासून दुरावतो आहे
पण तुला सांगतो मी तुझ्या रागवण्याला सरावतो आहे.

पुर्वी तू रागवीयची तेव्हा गोड दिसत होती
आता मला कळते ती तर   तुझी जन्मापासूनची खोड होती

आस्वाद

खांद्यावर पाय देउन तो आबाद होता,
मला गाडण्याचा हेतु तो निर्विवाद होता,

विरघळले रडु अश्रुंचा पाउस होता,
हसवण्याचा मेघांचा खोटा प्रमाद होता

थांबताना सारे पुढे मला का ढकलले,
सगळ्यांचा खुश असण्याचा उन्माद होता

एकदाच असावे निर्विघ्न ते चालणारे,
हात हाती देउन सोबतीचा नाद होता,

फूंकून चिंता धुरळ्यात दुःख उधळणारे,
घामाने

आस्वाद

खांद्यावर पाय देउन तो आबाद होता,
मला गाडण्याचा हेतु तो निर्विवाद होता,

विरघळले रडु अश्रुंचा पाउस होता,
हसवण्याचा मेघांचा खोटा प्रमाद होता

थांबताना सारे पुढे मला का ढकलले,
सगळ्यांचा खुश असण्याचा उन्माद होता

एकदाच असावे निर्विघ्न ते चालणारे,
हात हाती देउन सोबतीचा नाद होता,

फूंकून चिंता धुरळ्यात दुःख उधळणारे,
घामाने

पारिजात

नव्हती कधीच अपेक्शा सख्ये तुझ्या समागमाची
भेटीस हाय का मग आली माझ्या ही रात्र आसवाची

केले किती बहाणे मी तुज दुर सारण्याचे ओठात हाय का मग आले हे तराणे तुझ्या स्मरणाचे

दुरस्थ मी जरासा होतो रणान्गणाहुनि
जखम हि अशी या अश्वथाची हाय का आली मग नशिबी

आता कुठेशी होती झाली

उत्तर (चुकांचा गोषवारा द्यावा)

क्षितीजावर विश्वच फाटलेले
चालताना चादर शीवतो आहे

दिपस्तंभाने फसलेले खलाशी
ओळखीचा सागर शोधतो आहे

अतर्कित न तर्क विधात्याला
स्वचुकांचा हिशोब लीहितो आहे

काजवे झुरतात दिवसाला
दिनकराची सावली पाहतो आहे

मागणे ते मागताना मागले
विनासायास पुढेच चालतो आहे

प्रश्नांचे हे वावटळ प्रत्येकाचे
जमल्यास एक उत्तर आणतो आहे