चितेतही न जळलो मीचिंतेत तुझ्या,असा जळलो मीनिखारेही कधी ना पोळले शब्दांनी तुझ्या,असा होरपळलो मीबुडालो दुःखात माझ्याच असा माझाच मला, कधी न कळलो मीपाहून लागली हळद तुलाहाय रे दैवा,नुसताच हळहळलो मीऋतू आले नी गेले ना फुललो कधीआलीस तू ,नुसत्या जाणिवेने सळसळलो मीजुमानले ना संकटांनाही कधीनसण्याने पण तुझ्या,लक्षापासून ढळलो मीमारल्या हाका त्यांनी
विचाराधीन
तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.
मी
मी
निखारे ही ना कधी पोळले मला
असा शब्दांनी तुझ्या पोळलो मी
चितेनेही न जाळले मला
चिंतेत तुझ्या असा जळालो मी
बुडालो दुःखात माझ्याच असा की
माझाच मला न कधी कळालो मी
ऋतू आले नी गेले फुललो ना कधी
आलीस तू नुसत्या जाणिवेने सळाळलो मी
संकटांनाही जुमानले ना कधी
नसण्याने तुझ्या,जिवनापासून
सार्याच्या बगलेत...
सार्याच्या बगलेत छुपे खन्जीर,
इथे कुणीही साव नाही.
फावल्या वेळी जल्लाद सारे,
इथे भावनेस वाव नाही.
दुनीयेच्या बाजाराची,
ही रीतच आहे वेगळी.
सर्वाना हव्या पाकळ्या इथे,
फुलाना मात्र भाव नाही.
डोळ्यास पाणी लावणे,
कधीच ना जमले मला.
तेव्हाही ते अश्रु होते,
हाही रडण्याचा बनाव नाही.
आता कुठे जावून मी,
मोकळ्या
दाद होती !
त्या तुझ्या घावास माझी दाद होती
आसवांना पावसाची साथ होती
साजर्या वेशात आली वीज कोणी
ती नशीबाचा अनोखा वार होती
ऐकला मी ताल टाळ्यांचा मघाशी
ती कुणाची अंत्ययात्रा गात होती ?
मी जिच्यासाठी जगाला सोडलेले
पाय मागे ओढणारा गाव होती
भूतकाळाची पुन्हा कां ओढ लागे ?
मी कधीची कापली ती नाळ होती
कशासाठी ?
दूरच्या फुलातुनी हे, पाहणे कशासाठी ?
स्पंदनात श्वास बनुनी, वाहणे कशासाठी ?
बोल तू मनामधला, शब्द शब्द बेतलेला
कोष पांघरून परके, राहणे कशासाठी ?
वेदनेस अंतरीच्या, वाट तू गुलाबांना
खोचला उरात काटा, साहणे कशासाठी ?
गंध कस्तुरीचा तू, रंध्र रंध्र भारणारा
लेपुनी सुगंध खोटा, नाहणे कशासाठी ?
जीवनास एकट्याने, भेटणे मनी
चाललेला !
मी माणसे मनाला जडवीत चाललेला
की सावल्याच खोट्या कवळीत चाललेला ?
सोप्याच चेहर्याने आला कधी न कोणी
चेहर्यांचे उखाणे उकलीत चाललेला
दु:खात सोबतीला धावून तेच आले
नात्यास आसवांच्या मिरवीत चाललेला
चंद्रास पाहिला मी मंदावल्या पहाटे
चांदण्यांचा पसारा उचलीत चाललेला
आठवेना अता हे होतो खरा कसा मी
मुखवटे हे कुणाचे चढवीत
ओंजळ
आठवतय् मला....
विझलेल्या पणतीवर धरलेली ओंजळ
जळलेल् तळ आणि जुळलेलि बंधन
पायात रुतलेला बाभळीचा कटा
रक्ताचे थेंब आनि अश्रुचि फुंकर........
सुकलेले ओठ , लपलेला आवाज
खिळलेली नजर श्वासांचे कंपन..
मिटलेल्या पापण्या सोडलेलि साथ....
तुट्लेले सारे.. जुळलेल् बंधन.....
आणि शेवट पर्यत उरलेलि तुझि आठवन..................
बशीर बद्रच्या शेरांचा भावानुवाद
अब तेरे मेरे बीच कोई फासला भी हो...
हम लोग जब मिले तो कोई दूसरा भी हो...
तू जानता नही मेरी चाहत अजीब है
मुझको मना रहा है कभी खुद खफा भी हो...
उसके लिये नो मैनें यहां तक दुवांए की
मेरी तरह उसे कोई चाहता भी हो...
तुझ्या नि
जीवन
गरज माझी असता लागले टाळायला मला
त्यांची वेळ आली तर आले कवटाळायला मला ।
मी सोशिले चटके दु:खभरल्या क्षणांचे
मग आला वैशाखवणवा जाळायला मला ।
हात कुणाचे मिळावे म्हणून पाय कुणाचे ओढले
रीत जगाची लागली पाळायला मला ।
काल या इथेच ज्यांनी दगड होते मारले
आज आले गजरे माळायला मला
खरे ना?
आपलेही स्वप्न होते - हे खरे ना?
वाटले सारे खरेही - हे खरे ना?
मी म्हणालो - जायचे आहे जरासे
चालली होतीस तूही - हे खरे ना?
तापल्या वाळूत माझी वाफ झाली
पण बरसलो मी तिथेही - हे खरे ना?
लुप्त झाली वाहणारी शब्दधारा
जाणिवांचा बर्फ झाला - हे खरे