विचाराधीन

तांत्रिकदृष्ट्या निर्दोष नसलेल्या गझला इथे हलविण्यात येतील.

काही नाचतात मृत्यू......

" काही नाचतात मॄत्यू घेउनि हातात मॄत्यू     
  विसरले कोवळीक माणसाची का होउनी दिवाणे  ?

  हा रंग आणि गंध कधी होताच त्यांच्या अंतरी
  आज पेरतो वाटेत त्याच्या काटेकूटे नि वणवे...

  किती लांबला रस्ता किती लांबले तराणे,
  काहिच गोम कळेना फक्त कोडे आणि उखाणे...

  भुंकतात भुंकणारे झिंगतात झिंगणारे

झेप

फुलांकडे रंग थोडे मागायचे राहीले.
उधळून उरीचा गंध थोडा जगायचे राहीले.

सवाल नजरेने केलास अन् डोळ्यांत पाणी दाटले,
मौनाचे काही 'अटी-कायदे' पाळायचे राहीले.

कालच्या धुंद रात्री तुझी चाहूल ज्यांना लागली,
अर्थ त्या स्वप्नांचे तेवढे कळायचे राहीले.

एक हाक ऐकून माझी,अडखळले पाऊल जरी,
सांग 'मागे' तेव्हा तुझे का वळायचे राहीले ?

उजेडास

नको रातराणी नको पारीजात

नको रातराणी नको पारीजात,असा गुंतलो मी तुझ्या कुंतलात.
जणु जाहला जीव वेडा भुकेला,असा नाहलो मी दुधी चांदण्यात.
 
विना उत्तरे ती मिटे प्रश्न सारे,असे मौन होते दुवा साधणारे.
जरा गुंग होताच श्वासात उष्ण,पुन्हा दंगलो मी तुझ्या कंकणात.
 
जणु गूढ झाले मधाने मधुर,जणु चातकाला मिळे चंद्रकोर.
उराशी मला तु लपेटुनि

कर्नाटकी सत्तासोस

कर्नाटकात निजद आणि भाजप यांचे संयुक्त सरकार अस्तित्त्वात होते.
माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे सुपुत्र कुमारस्वामी मुख्यमंत्री होते, तर भाजपचे येडीयुरप्पा हे उपमुख्यमंत्री होते.
वीस महिन्यानंतर येडीयुरप्पानी मुख्यमंत्री व्हायचे असा करार होता. पण कुमारस्वामींनी सत्ता हस्तांतरणाला नकार दिला.
भाजपने पाठिंबा काढून घेतला. परस्परविरोधी विचारांच्या या दोन पक्षांचे सत्तेसाठी एकत्र येणे सामान्य

शब्दास ही आज माझ्या ये लाज ती जराशी

शब्दास ही आज माझ्या ये लाज ती जराशी
लेखणीस येते तरीही खाज ती जराशी
नजरेत दोष आहे या धुंद षोडषांच्या
चालीत दोष आहे बेबंद षोडषांच्या
कपड्यास आज आली व्हॅल्यु कमर्शीयल
रस्त्यात प्रदर्शिती त्या नाजुक पार्टीकल
व्यक्ती विकास व्हाया कपड्यास अर्थ नाही
तोकडे तरीही अगदीच व्यर्थ नाही
दिसतेच ते जगाला झाकुन

उधार आहे....

माझ्याकडे जगाचे हसणे उधार आहे....
त्या कोवळ्या कळीचे फुलणे उधार आहे....

घायाळ वेदनांनी केले उरात घरटे..
आगीत त्यास तेथे नेणे उधार आहे....

कोणास ठाव कोठे जाईल जीव माझा..
थोडे अजून बाकी जगणे उधार आहे....

देहावरी फुलांचे फेकाल हार माझ्या
उपकार परत ते ही करणे उधार आहे....

हा जन्म घेतला मी

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

सर्व गझलप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

( माफ करा, गझल विभागात अशा गद्यप्राय शुभेच्छा दिल्याबद्दल...! )

- प्रदीप कुलकर्णी

एका तळ्यात...

दोस्तांतला कुणी कधीच हरला नाही
एकांत बोचरा सरात सरला नाही

पाण्यात पाहुनी नभात उडता कोणी
आधार द्यावया जळी उतरला नाही

खोळंबले कधी सुवर्णकण अस्ताशी
संधिप्रकाश तो पुन्हा पसरला नाही

रात्रीस काजवे खुशाल लपले रानी
अंधार साथ ही कधी विसरला नाही

पंखांत चंद्र तो जरा वितळला रात्री
सूर्यास पाहता परांत ठरला नाही

गझल

निमिष्यही आत युगासम भासतो आहे
माझाच एका॑त आता माझ्यावर हासतो आहे.

कोणती जादू अशी केलिस तू ...?
स्वप्ना॑चा एक गाव मनात वसतो आहे.

सगळेच सोबतिला आसुनही येथे...
वस॑तातही तुझ्याविना शिषिर भासतो आहे.

तू तिथे मुग्ध अबोध अन् अजान इतकी...
मी इथे आठवा॑च्या ज्वाळास सोसतो आहे.

आनुभवले आजवर काजव्यास जरी मी

कवीमन चौकटी मानणार नाही

** कवीमन चौकटी मानणार नाही **


कविता काही गझल रचणार नाही
भाव मी अंकात मोजणार नाही

शब्दांना बांधा तुम्ही नियमाने
संवेदना मी  करकचणार नाही

नका  दाखवू शब्द घाव तुम्ही
तुडवलेलं फुल मी लपवणार नाही

तोला रे तुम्ही शब्दांची खोली
तराजूत मी मन तोलणार नाही

रेखाटा तुम्ही शब्द आकॄत्या
भू हे